ममता कुलकर्णींचा यू-टर्न, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे, लक्ष्मा त्रिपाठींनी काढली समजूत?
आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठींनी समजूत काढली आणि त्यानंतर ममता कुलकर्णी यांच्याकडून महामंडलेश्वर पदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यात आला आहे.
ममता कुलकर्णींकडून महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे घेण्यात आला आहे. ममता कुलकर्णींनी किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठींनी समजूत काढली आणि त्यानंतर ममता कुलकर्णी यांच्याकडून महामंडलेश्वर पदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यात आला आहे. ममता कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या महामंडलेश्वर पदानंतर चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. तर संत आणि महंतांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. किन्नर आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांवरही ममता कुलकर्णी यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. या संदर्भात, ममता कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ममता कुलकर्णी उर्फ यमाई ममता नंद गिरी यांनी म्हटले आहे की, माझ्या गुरूंनी मला पुन्हा या पदावर बसवले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. पुढे जाऊन मी माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला समर्पित करेन. २४ जानेवारी रोजी किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांच्यावर महामंडलेश्वर पदासाठी अभिषेक केला होता. १० फेब्रुवारी रोजी त्यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत किन्नर आखाड्याशी संबंध तोडल्याची घोषणा करणारा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला होता त्यानंतर आता हा त्यांनी निर्णय मागे घेतला आहे.
