“उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे…”, शिंदेगटाच्या वकिलांचा युक्तिवाद

| Updated on: Sep 27, 2022 | 3:15 PM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. शिंदेगटाचे वकील मनिंदर सिंग सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत आहेत.

Follow us on

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : शिंदेगटाचे वकील मनिंदर सिंग (Manindar Singh) सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) युक्तीवाद करत आहेत. यात त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. शिवसेना कोणाची हा निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. उपाध्यक्षांनी नोटीस दिली, पण केवळ 7 दिवसांचा कालावधी दिला होता. पक्षप्रमुख अध्यक्षांशी संवाद साधत नाहीत, तर गटनेता अध्यक्षांशी बोलतो, असं सिंह म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी केला आहे.