विजयकुमार घाडगेंचा खून करायचा प्रयत्न होता; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

विजयकुमार घाडगेंचा खून करायचा प्रयत्न होता; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

| Updated on: Jul 22, 2025 | 8:54 AM

लातूरच्या घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विजयकुमार घाडगेंची भेट घेतली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विजयकुमार घाडगेंची भेट घेतली आहे. लातूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी भेटीनंतर जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, बहुतेक आम्हाला अशी शंका आहे की हा हल्ला तटकरे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच घडवून आणलाय. हा तटकरे साहेबांनी सांगून घडवून आणलेला हल्ला आहे. म्हणजे किती मराठा द्वेष आहे यांच्यात यातूनही दिसून आलं आहे. विजय घाडगे यांना जीवे मारण्याचाच उद्देश या मारहाणीचा होता, असा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला आहे.

Published on: Jul 22, 2025 08:53 AM