Manoj Jarange Patil : साहेब… रिटायर्ड झालात तरी सुट्टी देणार नाही, BMC आयुक्तांना इशारा, जरांगेंचा गंभीर आरोप काय?
हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, त्यांची आझाद मैदानासह मुंबईत मोठी गर्दी जमली आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पालिका आयुक्तांवर मोठा आरोप केलाय
मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी मराठा आंदोलकांचं पाणी बंद केलंय, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी थेट BMC आयुक्तांवर गंभीर आरोप केलाय. तर कधी ना कधी वेळ बदलत असते, असंही वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. आयुक्त साहेब रिटायर्ड झालात तरी सुट्टी देणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना दिलाय.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह एल्गार पुकारलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्यभरातील मराठा बांधवाला थेट मुंबई गाठण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. या आवाहनानंतर मुंबईत शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेत. अशातच मराठ्यांच्या मुलांचा पाणी तुम्ही बंद केलंत, असं म्हणत मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांवर जरांगे पाटील यांनी निशाणा साधलाय.
