‘माझ्या नादाला लागू नको…’, जरांगे पाटील अन् भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली, काय केले आरोप-प्रत्यारोप?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांच्यामुळे मताधिक्यात कमी झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान त्यानंतर जरांगेंनी देखील भुजबळांना उत्तर दिल आहे.
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी जरांगे पाटीलांनी भुजबळांना इशारा दिला होता. दरम्यान हाच धागा पकडत भुजबळांनी एका मुलाखतीमधून जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. भुजबळांच्या टीकेनंतर जरांगे पाटीलानी देखील त्यांना इशारा दिला आहे. जरांगे पाटीलांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भुजबळांनी त्यांच्यावर बोलणं टाळलं. भटक्या विमुक्त ओबीसींच्या आरक्षणाची काळजी घेतो असं वक्तव्य त्यांनी यावेळेला केलं. एवढंच नव्हे दोन दिवसांपूर्वी भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बोट ठेवलं होतं. दरम्यान नरेंद्र पाटीलांनी केलेल्या विधानावर जरांगे पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाच्या भल्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटीलांनी सुरू केलेले उपोषण 30 जानेवारीला स्थगित केले. दरम्यान आरक्षणासाठी उपोषण करणार नसून समोरासमोरीची लढाई लढणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता. तर मराठा आरक्षणावरून जरांगे पाटीलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपोषण स्थगित केलं असेल तरीही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसंच मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईमध्ये येण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
