Manoj Jarange Patil : जरांगेंच्या हत्येचा कट कोणी रचला? धागेदोरे उघड, पोलिसांकडून आणखी ऐकाला अटक

Manoj Jarange Patil : जरांगेंच्या हत्येचा कट कोणी रचला? धागेदोरे उघड, पोलिसांकडून आणखी ऐकाला अटक

| Updated on: Nov 12, 2025 | 2:51 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी रात्री उशिरा कांचन साळवीला अटक केली आहे. यापूर्वी अमोल खुने आणि दादा गराड यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. साळवीने अमोल खुनेला ओळखत असल्याचे कबूल केले, मात्र दादा गराड यांच्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी रात्री उशिरा कांचन साळवी याला अटक केली आहे. यापूर्वीच अमोल खुने आणि दादा गराड यांना ताब्यात घेण्यात आले होते. साळवीच्या अटकेने या कटातील धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी कांचन साळवीची कसून चौकशी सुरू केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा स्वीय सहायक (पीए) असल्याचा आरोप केला होता. मात्र, साळवीने माध्यमांसमोर येऊन आपण अमोल खुनेला ओळखत असल्याचे मान्य केले, पण दादा गराड यांच्याशी आपला कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. उलट, दादा गराड आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत असल्याचा दावाही साळवीने केला होता. आता साळवीला अटक झाल्याने या कटामागील सत्य उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 12, 2025 02:43 PM