Manoj Jarange Patil Video : ‘…सरकारची तयारी सुरू’, लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
लाडक्या बहिणींकडून पैसे माघारी घेण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचे म्हणत लाडकी बहीण योजनेवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
‘सरकार बहिणींमध्ये भेदभाव करत आहे.’, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली तर लाडक्या बहिणींकडून पैसे माघारी घेण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचे म्हणत लाडकी बहीण योजनेवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. इतकंच नाहीतर सरकार लाडकी बहीण योजनेत उघडं पडलंय, अशी बोचरी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. ‘प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका बहिणीला वेगळा न्याय आणि दुसऱ्या बहिणीला वेगळा न्याय. निवडून येताना आणि मतं घेताना मोठ्या बहिणीलाही पैसे द्यावे वाटले आता त्याच बहिणीकडून पैसे परत घेत आहेत. किती ** पातळीचे लोकं आहात तुम्ही..’, असं म्हणत शाब्दिक हल्लाबोलच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर चढवला. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, ‘बहीण ही बहीण असते.. त्यात तुम्ही श्रीमंत आणि गरीब बघतात. मराठा आरक्षण दिलं जात नाही. ती सुविधा आहे तेच देत नाहीत तेच उघडं पडतंय. लाडकी बहीणमध्ये तर हे उघडे पडलेत’, असं म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू झालं असून आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर घणाघात केलाय.
