Jarange Patil Video : ‘… तर सुरेश धस हेच जबाबदार’, संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले होते. त्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप एक आरोप फरार आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सरकारकडे विनवण्या करताना दिसताय. अशातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संतोष देशमुख प्रकरण दाबलं गेलं तर त्याला सुरेश धस जबाबदार असतील’, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. इतकंच नाहीतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झालेत, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तर ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धसांवर नाव न घेता टीका केली आहे. ‘ज्याने संतोष देशमुख यांचा खून घडवून आणला. त्याच्या सोबत सुरेश धस मॅनेज झाला ही साधी गोष्ट नाही. पण मराठा समाज आहे हे प्रकरण कसं काय दाबलं जातंय बघू आणि जर दाबलं गेलं तर याला सुरेश धसच जबाबदार असतील. दोघात काय चर्चा झाली हे बाहेर कसं येणार?’ असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले होते. त्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
