Jarange Patil : तर बीड बंद करणार, मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, महादेव मुंडे प्रकरणी मोठी मागणी काय?
महादेव मुंडे प्रकरणात SIT गठीत केली त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना देखील अटक करतील, अशी आशा व्यक्त केली, यावेळी आठ दिवस वाट बघू, असा म्हणत इशाराही दिला.
बीड जिल्ह्यातील परळीत 20 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येला 21 महिने उलटून गेले तरीही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने उलटूनही अद्यापही आरोपी फरार असल्याने न्याय मिळाला, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. दरम्यान, महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना आठ दिवसांत अटक करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. आठ दिवसात आरोपींना न पकडल्यास बीड बंद करणार असा इशारच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ‘मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे मी ज्या अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत, त्यांच्यावर माझा जास्त विश्वास आहे ते आरोपींना अटक करतीलच’, असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.
