Manoj Jarange Patil : तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला…; मनोज जरांगेंनी सरकारला दिला शब्द!

Manoj Jarange Patil : तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला…; मनोज जरांगेंनी सरकारला दिला शब्द!

| Updated on: Sep 02, 2025 | 4:50 PM

मनोज जारंगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारला अल्टीमेटम दिले आहे. अंबल बजावणी आणि जीआर मिळाल्यास आंदोलन मागे घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाहीतर, मुंबई शहरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान सरकारला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “जर सरकारने आमच्या मागण्या मान्य करून तातडीने जीआर काढला, तर आज रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील.”

जरांगे पुढे म्हणाले, “तुमच्या ताकदीमुळे आम्ही जिंकलो आहोत. मागण्या मान्य झाल्या की, सर्व मराठे आनंदाने मुंबईबाहेर पडतील. एका तासात सर्व जीआर काढून आमच्याकडे घेऊन या, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय जाहीर करू.” त्यांनी सरकारला तीन स्वतंत्र जीआर काढण्याची मागणी केली: सातारा गॅझेटियरसाठी एक, हैदराबाद गॅझेटियरसाठी दुसरा आणि इतर मागण्यांसाठी तिसरा जीआर. जर सर्व काही सुरळीत झाले, तर रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई मोकळी करतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Published on: Sep 02, 2025 04:49 PM