Manoj Jarange Video : औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

Manoj Jarange Video : औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

| Edited By: | Updated on: Mar 22, 2025 | 7:14 PM

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात मोठा वाद सुरू असताना ही कबर हटवण्यासाठी राज्यात काही ठिकाणी आंदोलन होत आहेत. अशातच राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात सुरू असलेल्या वादावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘सरकारला औरंगजेबाची कबर काढायचीच नाही. त्यांनीच कबर फोकसला आणली. ते डबडं कुठं पुरून ठेवलंय हे कुणालाच माहिती नव्हतं. त्यांनी उलट माहिती करून दिली. औरंगजेबला फोकसमध्ये आणलं. सरकारला कबर काढायचीच नाही. काढायची असती तर त्यांनी पोलीस संरक्षण नसतं लावलं. राजकारण नाही पण त्यांना फायद्यासाठी लढायचं आहे’, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर त्यांना मराठ्यांची नस कळली आहे. मारामाऱ्या करण्यासाठी त्यांनी मराठ्यांना ठेवलं आहे. यांनी आमचा खूप वापर केला. आमच्या लेकरांनी मारामाऱ्या करायच्या आणि मलिदा यांनी खायचं काम सुरू आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. 70-75 वर्ष यांनी मराठ्यांचा भांडणासाठी वापर केला. आता ते फक्त उकरून काढतात आणि भांडणं लावून मोकळे होतात. या राजकारणामुळे आमच्या समाजाची लेकरं खाक झाली, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.

Published on: Mar 22, 2025 03:56 PM