Maratha Reservation : आरक्षण मिळणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ पण… जरांगेंच्या मागणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट स्पष्ट म्हणाले..

Maratha Reservation : आरक्षण मिळणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ पण… जरांगेंच्या मागणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट स्पष्ट म्हणाले..

| Updated on: Aug 30, 2025 | 1:05 PM

वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांच्यासाठी आरक्षण आवश्यक आहे आता हाच मुद्दा बरोबर आंबेडकरांनी घटना समितीमध्ये मांडला होता. चौदाव्या कलमाखाली कायद्याची समानता आहे परंतु जे विकर सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी खास तरतुदी करणं आवश्यक आहे म्हणजेच रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे, असं उल्हास बापट म्हणाले.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरूवारी सकाळीच मनोज जरांगे पाटील शेकडो मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झालेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

‘समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि रिझर्वेशन जे आहे ती विशेष तरतूद विशेष सवलत तुम्हाला दिलेली आहे तो हक्क नाही. कारण आंदोलकांकडून आमच्या हक्काचं वगैरे अशी घोषणा दिल्या जातात पण तसं नाहीये तो हक्क नाहीये ती सवलत आहे’, असं उल्हास बापट यांनी म्हटलं तर आंबेडकरांनी असं सांगितलंय, जी सवलत देण्यात आलेली आहे ही अधिकारापेक्षा जास्त मोठी असू शकत नाही आणि म्हणून रिझर्वेशन 50 टक्क्यांच्यावर जास्त देता येणार नाही आणि हाच मुद्दा इंद्रसहानी केस मध्ये सुप्रीम कोर्टाने एकमताने मान्य केला आणि त्यामुळे गेले 30 वर्ष भारतात अशी पोझिशन आहे की आरक्षण 50 टक्के च्या वर देता येत नाही.

Published on: Aug 30, 2025 12:51 PM