Manoj Jarange Patil Video : ‘…ते दिसलं नाही का?’, बीड हत्या प्रकरणावरून जरांगेंचा थेट नामदेव शास्त्रींनाच सवाल

Manoj Jarange Patil Video : ‘…ते दिसलं नाही का?’, बीड हत्या प्रकरणावरून जरांगेंचा थेट नामदेव शास्त्रींनाच सवाल

| Updated on: Feb 01, 2025 | 5:50 PM

संतोष देशमुख यांच्या अंगात साकळलेलं रक्त दिसलं नाही का? असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना सवाल केला आहे. बीड प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘धनंजय मुंडे यांना नुसती सलाईन लावली आणि थोडसं रक्त आलं. तुम्ही भावनाविवश झालात की लगेच ते म्हणाले की, आरोपींचा […]

संतोष देशमुख यांच्या अंगात साकळलेलं रक्त दिसलं नाही का? असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना सवाल केला आहे. बीड प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘धनंजय मुंडे यांना नुसती सलाईन लावली आणि थोडसं रक्त आलं. तुम्ही भावनाविवश झालात की लगेच ते म्हणाले की, आरोपींचा विचार करा, गुन्हेगार नाही… असं म्हणाले. पण तुम्हाला संतोष देशमुख यांच्या अंगात साकाळलेलं रक्त लिटरभर होतं ते तुम्हाला दिसलं नाही. शेवटी आज संतोष देशमुख जगात नाही. त्यांच्या रक्ताचा विचार का केला नाही?’, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, धनंजय मुंडे यांना गेल्या ५३ दिवसांपासून झोप नाही. ते जेव्हा भगवानगडावर आले तेव्हा त्यांच्या हातावर सलाईन होती, असं महंत नामदेव शास्त्री यांनी काल म्हटलं होतं. पुढे ते असेही म्हणाले,  ज्यावेळी घर फुटलं तेव्हा धनंजय मुंडेंनी खूप सोसलं आहे. आता उंच उडाण घेत असताना गेल्या ५३ दिवसात धनंजय मुंडेंची मानसिक अवस्था कशी आहे? ते भगवान गडावर आले असले तरी हातावर सलाईन आहे. किती सहन करावं एखाद्याने… असं म्हणत धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले.  त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Feb 01, 2025 05:49 PM