Jarange Patil : नीट रहा… मी दोघांचा बाजार उठवीन… रक्ताने हात भरलेल्यांनी नादी लागू नये, जरांगेंनी कुणाला भरला दम?

Jarange Patil : नीट रहा… मी दोघांचा बाजार उठवीन… रक्ताने हात भरलेल्यांनी नादी लागू नये, जरांगेंनी कुणाला भरला दम?

| Updated on: Oct 03, 2025 | 12:15 PM

मनोज जरांगे यांनी विरोधकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे, "रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या नादी लागू नये". त्यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर तसेच धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यांवरून टीका करत बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या विरोधकांना अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला आहे. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर किंवा माझ्यावर बोलायचं नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. मला काहीही न करता लक्ष्य केले जात असून शिव्या खाव्या लागल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, जर कोणी माझ्या नादी लागला, तर मी दोघांचा बाजार उठवीन. त्यांनी कोणत्याही फसवणुकीचे राजकारण आपल्याजवळ नसल्याचे स्पष्ट केले. मराठ्यांनी आरक्षण मिळवण्यासाठी डोळे उघडून पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत, आमच्या ताटातलं घेऊ नका, असे ते म्हणाले. काही लोकांनी बंजारा समाजाच्या ५% जागा खाल्ल्याचा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.

Published on: Oct 03, 2025 12:15 PM