तर मोठी उलथापालथ होणार? मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांसोबतच्या युतीवर काय म्हणाले?

| Updated on: Mar 27, 2024 | 2:57 PM

मराठा समाजाने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सध्या गावागावात बैठका घेणं सुरू असून राजकीय रणनिती देखील ठरवली जात आहे. मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत वेगळीच भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावर जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

Follow us on

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे २४ तारखेला झालेल्या बैठकीत मराठा समाजाने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सध्या गावागावात बैठका घेणं सुरू असून राजकीय रणनिती देखील ठरवली जात आहे. मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत वेगळीच भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मराठा समाजाची भूमिका आम्ही ३० तारखेला जाहीर करणार आहोत. निवडणूक लढवायची हे पक्क झालंय. निवडणूक लढवायची का? आपल्याला राजकारणात जायचं का? एकच उमेदवार द्यायचा का? यावर मराठा समाजाचं मत अहवाल आल्यानंतर ३० तारखेला आम्ही आमची भूमिका सांगू’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुढे असेही सांगितले की, आंबेडकर यांच्यासोबत आमची भेट झाली पण आमचा निर्णय ३० तारखेला होणार आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. आमचा 30 तारखेला निर्णय आल्यास आम्ही पुन्हा निर्णय घेणार आहोत भेटणार आहोत. अद्याप आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही, पाठिंबा आणि उमेदवार आम्ही 30 तारखेला ठरवणार आहोत. मी आधीच कुणाला पाठिंबा देणार नाही फसवणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.