MNS : विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; अविनाश जाधवांचा पुन्हा इशारा, नादी लागू नका नाहीतर…

MNS : विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; अविनाश जाधवांचा पुन्हा इशारा, नादी लागू नका नाहीतर…

| Updated on: Jul 17, 2025 | 10:03 AM

विक्रोळी येथे मराठी माणसांचा अपमान केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मराठी माणसाचा अपमान होईल असं स्टेटस ठेवल्याने संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला मारहाण केली. या घटनेमुळे विक्रोळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबईतील विक्रोळी भागात मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. मारवाडी व्यापाऱ्याने मराठी माणसाचा अपमान करणारं स्टेटस ठेवलं होतं. ही बाब मनसे कार्यकर्त्यांना समजताच, त्यांनी तात्काळ मारवाडी व्यापाऱ्याच्या दुकानाच्या दिशेने धाव घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी या व्यापाऱ्याला जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र या सगळ्या प्रकारानंतर त्याला मनसेकडून चोप देण्यात आला. मनसे पदाधिकारी विश्वजीत ढोलमसह इतरांनी या अमराठी असणाऱ्या व्यापाऱ्याची धिंड काढली. या प्रकरणावर बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा अमराठी लोकांना इशारा दिलाय. ‘आम्हाला कोणालाही ताकद दाखवायची नव्हती. पण महाराष्ट्रात तुम्ही बाहेरून येऊन तुमचं पोट भरतात आणि मराठी भाषेबद्दल चुकीचे उद्घार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच..’

Published on: Jul 17, 2025 10:02 AM