Ajit Pawar : मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे नेमकं घोडं अडलं तरी कुठं? पवारांचा सरकारला सवाल

Ajit Pawar : मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे नेमकं घोडं अडलं तरी कुठं? पवारांचा सरकारला सवाल

| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 6:42 PM

एक महिना उलटून गेला तरी कोणत्याच खात्याला मंत्री मिळेलेला नाही. नेमकी सरकारची अडचण काय आहे असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांना केंद्रातून ग्रीन सिग्नल मिळेना की अंतर्गत धूसफूस वाढल्याने विस्तार लांबणीवर पडला अशी शंका त्यांनी उपस्थित केला आहे. खात्याचे काही का होईना पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामती : राज्यातील जनता एक ना अनेक समस्यांनी त्रस्त आहे. एकीकडे पावसामुळे खरिपाचे नुकसा झाले आहे तर दुसरीकडे घरांचीही पडझड मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक ना अनेक अडचणी असताना मात्र, राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ घोषणाबाजी करुन काय होत नाहीतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे गरजेचे असते. एक महिना उलटून गेला तरी कोणत्याच खात्याला मंत्री मिळेलेला नाही. नेमकी सरकारची अडचण काय आहे असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांना केंद्रातून ग्रीन सिग्नल मिळेना की अंतर्गत धूसफूस वाढल्याने विस्तार लांबणीवर पडला अशी शंका त्यांनी उपस्थित केला आहे. खात्याचे काही का होईना पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Published on: Aug 05, 2022 06:42 PM