Manoj Jarange Patil : बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

Manoj Jarange Patil : बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

| Updated on: May 01, 2025 | 4:36 PM

Manoj Jarange Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे.

बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. जरांगे हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. जालन्यातून बीड दौऱ्यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत.  या दौऱ्यादरम्यानच त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने संभाजीनगरला आणण्यात आलं. सध्या त्यांच्यावर संभाजीनगर येथील गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिशन मुंबई म्हणत जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांच्या मराठवाड्यात सातत्याने बैठका होत आहेत. त्याच बैठकांसाठी बीड दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत आज पुन्हा अचानक बिघडली.

Published on: May 01, 2025 04:36 PM