Solapur : मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ अन् हाणामारी

Solapur : मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ अन् हाणामारी

| Updated on: Jul 15, 2025 | 7:05 PM

सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली आहे.

सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली आहे. मराठा समाजाची एक बैठक याठिकाणी बोलावण्यात आलेली होती. याचवेळी या बैठकीत गदारोळ झालेला बघायला मिळाला आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही बैठक आज बोलावण्यात आली होती. यावेळी बैठकीत जन्मेजय राजे भोसले यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला.

सोलापुरात आज होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला अक्कलकोटमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले होते. जन्मेजय राजे भोसले यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने हा हाणामारीचा प्रकार घडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. प्रवीण गायकवाड यांच्यावर ज्या कार्यक्रमात हल्ला झाला त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जन्मेजय राजे भोसले होते. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारीतून या प्रकरणी पोलीस ठाण्यात जाणं आणि तक्रार देणं गरजेचं होतं, अशी नाराजी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. याचवेळी बैठकीत त्यांचा एकेरी उल्लेख झाल्याने हा संपूर्ण वाद सुरू झाला.

Published on: Jul 15, 2025 07:02 PM