बीडमध्ये मनोज जरांगेंचा अपघात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

बीडमध्ये मनोज जरांगेंचा अपघात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

| Updated on: Aug 03, 2025 | 5:17 PM

बीड येथील शिवाजीराव क्रिटिकल केअर रुग्णालयात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात घडला.

बीड येथील शिवाजीराव क्रिटिकल केअर रुग्णालयात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात घडला. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट अचानक बंद होऊन थेट खालच्या मजल्यावर आदळली. सुदैवाने, या अपघातात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. लिफ्टचा दरवाजा तोडून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासह काही सहकारी लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर जात असताना हा अपघात घडला. लिफ्ट अचानक बंद होऊन ती ग्राऊंड फ्लोअरवर कोसळली. या घटनेनंतर तातडीने दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

Published on: Aug 03, 2025 05:17 PM