Maratha Reservation : मुंबईत हजारो मराठे, BMC बाहेर आंदोलकांच्या गर्दीत अडकल्या बसेस, असा होतोय रस्ता मोकळा, बघा ड्रोन दृश्य
मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना सहकार्य करत रस्ता मोकळा केलाय.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, त्यांची आझाद मैदानासह मुंबईत मोठी गर्दी जमली आहे. सीएसएमटी, चर्चगेट, आणि ईस्टर्न फ्री-वेसारख्या प्रमुख ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सायन-पनवेल हायवेवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी आंदोलकांनी “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आहे.
अनेक आंदोलक सीएसएमटी स्थानकात आणि शहराच्या इतर भागांमध्ये विश्रांती घेत असल्याचे दिसून आले. आंदोलनामुळे मुंबई शहरातील रस्त्यांचे ब्लॉक झाले असून, वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्यादुसऱ्या दिवशी देखील मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था रखडली. तर मुंबई पोलिसांनी आवाहन केल्यानंतरही मराठा आंदोलकांनी BMC बाहेर मोठी गर्दी केली. तर मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर मराठा आंदोलकांनी BMC बाहेर रस्ता पोलिसांच्या मदतीने मोकळा करण्यात सुरूवात झाली आहे.
