Imtiaz Jaleel Letter Video : ‘औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?’, इम्तियाज जलील यांचं जनतेला खरमरीत पत्र

Imtiaz Jaleel Letter Video : ‘औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?’, इम्तियाज जलील यांचं जनतेला खरमरीत पत्र

| Updated on: Mar 19, 2025 | 11:46 AM

इम्तियाज जलील यांनी नुकतंच त्यांच्या ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या सद्यस्थिती वर मा. खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया असे म्हटले आहे

मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक नाही. औरंगजेबावर मीच का बोलावं? असा सवाल करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व विरोधकांनी बोललं पाहिजे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. त्या काळात औरंगजेब एक राजा होता ही वस्तुस्थिती आहे. औरंगजेबनं प्रांत जिंकण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम पातशाह्यांशी युद्धा संघर्ष केले. प्रत्येक राजा सत्तेसाठी स्वतःच्या रक्ताच्या नातलगांशी लढला. त्याचा धर्म कोणता हा प्रश्नच नाही. तो त्याकाळी राजा होता, तेव्हा लोकशाही नव्हतीच पण आज लोकशाही आहे. याचा विसर आपल्याला पडतोय. याच्याइतकी मोठी शोकांतिका नाही, असे इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे म्हटलंय. पुढे ते असेही म्हणाले, ‘मला औरंगजेब या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमे करत आहेत. सर्वप्रथम या सर्व माध्यमांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मी मुसलमान लोकप्रतिनिधी आहे म्हणून जर तुम्ही मला बोलते करू इच्छित असाल तर तुमच्या पत्रकारितेत खोट आहे. मी भारतीय मुसलमान आहे हे नक्की. मात्र ते भारतीय असणे तुम्हाला एरवी आठवत नाही याच्या वेदना होतात. बाबरी मशीद प्रकरण पेटवून भाजपा मोठी झाली. आता औरंगजेबाची कबर उध्वस्त करायच्या धमक्या काही धर्मांध संघटना देत आहेत. त्यावर सत्ताधारी मौन आहेत. इतकेच नव्हे तर शाहू, फुले व आंबेडकरांची परंपरा सांगणारेही मौन आहेत हे अधिक आश्चर्यकारक आहे’.

 

Published on: Mar 19, 2025 11:33 AM