शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली

शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 7:56 PM

एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवल्यानंतर मविआच्या विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शिवसेना आता जनाब शिवसेना झाली असल्याची टीका केली आहे. तसेच आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विजयी भाजपला देशात कोणतेही पक्ष एकत्र आले आले तरी भाजपला हरवू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तर […]

एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवल्यानंतर मविआच्या विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शिवसेना आता जनाब शिवसेना झाली असल्याची टीका केली आहे. तसेच आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विजयी भाजपला देशात कोणतेही पक्ष एकत्र आले आले तरी भाजपला हरवू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तर भाजपच्या नितेश राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करत त्यांनी शिवसेनेला आता ISIS तेवढाच प्रस्ताव येणे बाकी आहे अशी टीका त्यांनी कली आहे. ज्या कट्टर एमआयएम पक्षाबरोबर महाविकास आघाडी सरकार विचार करत असेल तर शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.