Munde Son Post Video : ‘माझ्या आईकडूनच घरगुती हिंसाचार अन् तिच वचपा काढायची…’, धनंजय मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट

Munde Son Post Video : ‘माझ्या आईकडूनच घरगुती हिंसाचार अन् तिच वचपा काढायची…’, धनंजय मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट

| Updated on: Feb 06, 2025 | 5:31 PM

करुणा शर्मा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याची एक भावनिक पोस्ट समोर आली आहे. शिशीव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट टाकून मोठा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीच हानिकारक नव्हते तर आईच घरगुती हिंसाचार करायची असा खुलासा शिशीव मुंडे याने केलाय. ‘मी शीशिव धनंजय मुंडे, […]

करुणा शर्मा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याची एक भावनिक पोस्ट समोर आली आहे. शिशीव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट टाकून मोठा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीच हानिकारक नव्हते तर आईच घरगुती हिंसाचार करायची असा खुलासा शिशीव मुंडे याने केलाय. ‘मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. जो घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरगुती हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण आणि माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा’, असे तो म्हणाला.

पुढे त्याने असंही म्हटलं की, माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक, मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला, माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही, असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते, असल्याचेही शिशीव मुंडे याने या पोस्टच्या माध्यमातून म्हटले.

Published on: Feb 06, 2025 05:31 PM