मंत्र्यांचे ओएसडी की पत्रकार? पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह, अटक होताच बाहेर आले सत्य

| Updated on: Jan 31, 2023 | 3:13 PM

पेपर आणि पोर्टलचे पत्रकार आहोत असे सांगून एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एक पत्रकार, दोन संपादक आणि एका अन्य व्यक्तीचा समावेश आहे.

Follow us on

नागपूर : नागपूर येथील एका व्यापाऱ्याकडे मंत्र्यांचे ओएसडी आहे असे सांगून १ कोटीची खंडणी मागणाऱ्या तीन पत्रकारांसह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे. संपादक संजय बघेल, संजीत बघेल आणि पत्रकार पियुष पुरोहित अशी या तिघांची नावे आहेत.

आम्ही पत्रकार आहोत असे सांगून त्यांनी एका व्यापाऱ्याकडे १ कोटी खंडणीची मागणी केली. तसेच, त्या व्यापाराच्या संदर्भात आलेल्या बातम्यांच्या क्लिप्स बनवून त्या व्यापाऱ्याकडून पैसे मागितले होते. त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तेव्हा त्यांनी सेटलमेंट करण्यासाठी एक दलालही घेतला. तसेच, आम्ही मोठ्या व्यक्तीच्या आफिसमध्ये काम करत असून तुमचा प्रॉब्लेम दूर करू असे सांगून त्यांनी खोट्या नंबरवरून पैशांसाठी तगादा लावला आहोत. अखेर, त्या व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी पियुष पुरोहित, संपादक संजय बघेल, संजीत बघेल आणि एक व्यक्तीस अटक केली. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे.