पेट्रोल-डिझेलचे दर अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवे यांचा अजब शोध

पेट्रोल-डिझेलचे दर अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवे यांचा अजब शोध

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:40 PM

आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

मुंंबई : आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Diesel Price) या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने काढलेल्या महागाईच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं.