Sanjay Shirsat : लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; कर्जमाफीवर शिरसाटांचा मोठा खुलासा

Sanjay Shirsat : लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; कर्जमाफीवर शिरसाटांचा मोठा खुलासा

| Updated on: Mar 30, 2025 | 5:46 PM

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर 43 हजार कोटींचा भार आलेला असल्याचं विधान आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आला असल्याचं शिंदेगटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. योजना जाहीर झाल्यानंतर तिजोरीवर 43 हजार कोटींचा भार आला आहे. त्यामुळे वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, ‘अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे, त्या अनुषंगाने कदाचित अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्यावेळी त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास 43 हजार कोटींचा आहे. त्यामुळे विकासाची कामं असली तरी त्याची गती मंदावली आहे. म्हणून पुढच्या काळात महसूल कसा वाढेल याकडे सरकारचं लक्ष आहे. महसूल वाढला तर या कामांना गती देता येईल. लाडकी बहीण योजना ही कायम चालू ठेवायला मदत देखील करता येईल.

Published on: Mar 30, 2025 05:46 PM