Shambhuraj Desai : अरे.. आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं.. भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्…
विधानसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटाच्या सदस्यांत आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच महाविकास आघाडीच्या सदस्यांनी थेट फडणवीस सरकारची लाज काढल्यानं सभागृहात एकच गदारोळ पाहायला मिळाला आणि तालिका अध्यक्षांवर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटं तहकूब केलं.
ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी आज सभागृहात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील संरक्षण विभागाच्या 42 एकर जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. संरक्षण विभागाच्या मालकीच्या या जमिनीवर सद्यस्थितीत 9483 झोपड्या आहेत. या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सरकार हा प्रश्न केव्हापर्यंत निकाली काढणार? असा थेट सवालच वरूण सरदेसाई यांनी सरकारला केला. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले.
शंभुराजे आक्रमक झाले आणि म्हणाले, या प्रकरणी 2019 ते 2022 पर्यंत ठाकरे सरकार कोणताही पाठपुरावा केला नाही. मला फार खोलात जायचे नव्हते. पण अपुऱ्या ब्रिफिंगचा आरोप होत असताना ते म्हणाले, 2019 ते 2022 या अडीच वर्षात या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन ठाकरे सरकारने केंद्राकडे केला नाही. यानंतर ठाकरे गटाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू करून चक्क फडणवीस सरकारची लाज काढली. अरे तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले हे सांगा. एकही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. कुणाचे सरकार होते त्या काळात. उलट एकनाथ शिंदे 2022 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही 4 वेळा पाठपुरावा केला. तुम्ही काय केले? अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केले हे सांगा. तुम्ही काहीही केले नाही. आम्ही करून दाखवले
