रवींद्र धंगेकरांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित? सामंतांची ऑफर, स्पष्टच म्हणाले, ‘…तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही’
रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातचत यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअॅप स्टेट्स आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातचत यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करताना असे म्हटले की, “मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यात जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात त्यावर धनुष्यबाण आला तर आम्हाला सर्वांना आनंदच होईल.” पुढे ते असेही म्हणाले, मी कालच रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण दिलं की, त्यांच्यासारखा सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीने सामाजिक काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवाय पर्याय नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकरांना काल खुली ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, या ऑफरवर धंगेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. “त्यांना वाटतं असेल की, आपला मित्र जवळ असला पाहिजे. कोणालाही तसं वाटतं. माझा स्वभाव चांगला आहे. त्यामुळे ऑफर देणं काही चुकीचे नाही.”, असं रवींद्र धंगेकर म्हणालेत. त्यामुळे भविष्यात रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
