Jitendra Awhad यांनी अण्णा हजारे यांना डिवचलं अन् अण्णा हजारे यांनी आव्हाडांना काय दिला थेट इशारा?

Jitendra Awhad यांनी अण्णा हजारे यांना डिवचलं अन् अण्णा हजारे यांनी आव्हाडांना काय दिला थेट इशारा?

| Updated on: Oct 07, 2023 | 12:02 PM

tv9 Special Report | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत समाज सेवक अण्णा हजारे यांना डिवचण्याचाच प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनंतर अण्णा हजारे चांगेलच संतापलेत आणि त्यांनी प्रत्युत्तर देत बघा काय दिला इशारा?

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तर अण्णा हजारे यांनी आव्हाडांना अब्रनुकसानीचा दावा ठोकण्याचाच इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांचं राजधानी दिल्लीतील जंतरमंतर आणि रामलिला मैदानावरील आंदोलन चांगलंच गाजलं होतं. तत्कालीन काँग्रेस सरकारचा पाया अण्णांच्या याच आंदोलनामुळे ढासळला. माहितीचा अधिकार, भ्रष्टारविरोधी कायदा, लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी केलेली आंदोलनं देशभरात गाजली. मात्र, अण्णा आता शांत झालेत. भाजप सरकार विरोधात अण्णा हजारे आंदोलन का करत नाहीत? असा सवाल विरोधकांकडून अनेकदा उपस्थित झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत अण्णांना डिवचण्याचाच प्रयत्न केलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनंतर अण्णा हजारे चांगेलच संतापलेत. प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराच आव्हाड यांना दिलाय. अण्णा हजारे यांच्या इशाऱ्यानंतर आव्हाड यांनी आपलं ट्वीट रिट्वीट करत अण्णांवर पुन्हा निशाणा साधलाय. बघा स्पेशल रिपोर्ट काय लगावला टोला

Published on: Oct 07, 2023 11:56 AM