बॅनर लागले सोलापुरात चर्चा मात्र राज्यभर; आमदार प्रणिती शिंदे याचं नाव का येतयं चर्चेत?

बॅनर लागले सोलापुरात चर्चा मात्र राज्यभर; आमदार प्रणिती शिंदे याचं नाव का येतयं चर्चेत?

| Updated on: Aug 27, 2023 | 7:42 AM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नवे-जुने चेहरे समोर येत आहेत. तर अनेकांच्या नावापुढे आता भावी खासदार-आमदार लागताना दिसत आहे. सोलापुरातही एका राजकीय नेत्याच्या नावापुढे भावी खासदार लागल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोलापूर : 27 ऑगस्ट 2023 | राज्यात काहीच महिन्यांच्या अंतरावर आगामी लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जाऊ लागलेली आहे. तर काही विद्यमान आणि माजी आमदार हे भावी खासदारकीच्या रेसमध्ये येत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात विविध नावे समोर येत आहेत. तर त्यांचे तसे भावी खासदार-भावी आमदार म्हणून बॅनर लागत आहेत. सोलापूरमध्ये देखील आता असाच एक बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही बॅनर लावण्यात आले आहेत. या लावलेल्या बॅनरवर आमदार प्रणिती शिंदे यांचे ‘भावी खासदार’ म्हणून उल्लेख आहे.

मागील काही दिवसापासून सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून कोण लढणार याविषयी चर्चा सुरु होती. त्यातच राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने देखील सोलापूर लोकसभा जागेवर आपला दावा सांगितलं होता. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पुढे केले जातं असल्याचे दिसतेय.

Published on: Aug 27, 2023 07:42 AM