Ravi Rana यांना स्वागत रॅली दरम्यान चक्कर, कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले

Ravi Rana यांना स्वागत रॅली दरम्यान चक्कर, कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 7:55 PM

राजपेठ उड्डाणपुलावरील (Rajpeth flyover) शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली. तसेच अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे राणा म्हणाले. रवी राणा यांची निषेध रॅली संपली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरच आमदार रवी राणा यांना भोवळ आली.

अमरावती : अमरावतीमध्ये तब्बल पंधरा दिवसांनंतर दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जयस्तंभ चौकात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांनी मौन धारण केले. मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांचा जाहीर निषेध केला. कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोस्टर फडकवले. रवी राणा यांनी राज्य सरकारवर टीका केली. राजपेठ उड्डाणपुलावरील (Rajpeth flyover) शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली. तसेच अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे राणा म्हणाले. रवी राणा यांची निषेध रॅली संपली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरच आमदार रवी राणा यांना भोवळ आली. त्यामुळं त्यांना त्यांच्या राजापेठ येथील कार्यालयात नेण्यात आले.