Suresh Dhas : ‘जाउद्या हो.. त्यावर काय बोलायचं..’, सतीश भोसलेवर बोलणं सुरेश धसांनी का टाळलं?
Suresh Dhas On Satish Bhosale : आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज जनता दरबार भरवला होता. यात कार्यकर्ते ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी सतीश भोसले विषयी प्रश्न विचारल्यावर मात्र धस यांनी त्यावर बोलणं टाळल्याचं बघायला मिळालं.
ज्यांना मोर्चे काढायचे ते काढतील. ज्यांना काम करायचं ते काम करतील. लोकांचे काम करणं हे माझं काम आहे, मी तेच करतो आहे, असं आमदार सुरेश धस यांनी म्हंटलं आहे. एकीकडे सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी असलेल्या सतीश भोसलेच्या अटकेची मागणी होत असतानाच दुसरीकडे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या कार्यालयात आज जनता दरबार घेण्यात आला आहे. सुरेश धस यांनी भरवलेल्या या जनता दरबारात कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं.
यावेळी सुरेश धस यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. त्यावेळी धस यांनी सतीश भोसले याच्या विरोधात होणाऱ्या मोर्चावर बोलताना ज्यांना मोर्चे काढायचे ते काढतील, अशी प्रतिक्रिया देत जाउद्या, त्यावर काय बोलायचं असं म्हणत सतीश भोसलेवर बोलणं टाळलं आहे.
Published on: Mar 09, 2025 04:20 PM
