पनवेलमधील बारवर मनसेचा खळ्ळखट्याक; व्हिडीओ व्हायरल

पनवेलमधील बारवर मनसेचा खळ्ळखट्याक; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 03, 2025 | 2:53 PM

पनवेलमधील कोनगाव येथील नाईट राइड डान्स बारमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील डान्स बारच्या मुद्द्यावर तीव्र भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी पनवेलमधील लेडीज बारचा विशेष उल्लेख करत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार असल्याबद्दल खेद व्यक्त केला.

या भाषणानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, पनवेलमधील कोनगाव येथील नाईट राइड डान्स बारमध्ये त्यांनी तोडफोड केली. मनसेच्या ‘खळ खट्याक’ पद्धतीचा अवलंब करत ही कारवाई करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या निमंत्रणानुसार राज ठाकरे यांनी काल या सोहळ्यास हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील डान्स बारमुळे तरुणांचे होणारे नुकसान अधोरेखित केले होते. त्यांच्या या टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील डान्स बारवर कारवाई करत आपला रोष व्यक्त केला.

Published on: Aug 03, 2025 02:53 PM