Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये ठाकरे-मनसेत मनोमिलनाचे वारे; प्रकाश महाजन आणि चंद्रकांत खैरे यांची भेट

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये ठाकरे-मनसेत मनोमिलनाचे वारे; प्रकाश महाजन आणि चंद्रकांत खैरे यांची भेट

| Updated on: Jun 29, 2025 | 2:02 PM

Raj-Udhav Thackeray Reunion Updates : मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची आज भेट झाली आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची आज भेट झाली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. एकीकडे 5 जुलैला ठाकरे बंधूंचा हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र मोर्चा निघणार आहे. तर दुसरीकडे आता मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये देखील जवळीक बघायला मिळत आहे. मोर्चाशी संबंधित चर्चेच्या निमित्ताने या दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.

राजकीय वर्तुळात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. या मोर्चात ठाकरे बंधु एकत्र दिसून येणार आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरेंची युती होईल का? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मनोमिलनाचे चित्र बघायला मिळत आहे.

Published on: Jun 29, 2025 02:01 PM