Avinash Jadhav : जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच – अविनाश जाधव

Avinash Jadhav : जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच – अविनाश जाधव

| Updated on: Apr 13, 2025 | 5:14 PM

MNS Conflict With North Indian : मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज केवळ उत्तर भारतीय लोकांशीच मनसेचा का वाद होतो यावर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही? परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांसोबतच वाद का होतो? असा सवाल मनसेचे अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसंच उद्धटपणे बोलतात त्यांना आमचा हात लागतो, असंही अविनाश जाधव यांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात फक्त उत्तर भारतीय लोक राहात नाही. आपल्या राज्यात गुजराती, राजस्थानी, पंजाबी राहतात. त्यांच्याशी का वाद होत नाही? परप्रांतीय म्हणून आमचा एकाच भाषिक लोकांबरोबर का वाद होतो? कारण यांचे नेते चांगले नाही. तुम्ही महाराष्ट्रात राहतात तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे एवढंच आमचं म्हणण आहे. ज्यावेळी आम्हाला असे लोक भेटतात की ज्यांना मराठी येत नाही पण ते सांगतात की आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आम्ही त्यांना मिठी पण मरतो. पण जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच, असं अविनाश जाधव म्हणाले.

Published on: Apr 13, 2025 05:14 PM