पुण्यात मनसेचा 16 वा वर्धापन दिन, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 16 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात थोड्याच वेळात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 16 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात थोड्याच वेळात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडणार आहे. राज ठाकरे आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असून ते महापालिका निवडणुका जिंकण्याच्या निर्धारानं लढाव्यात अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना देतील. राज ठाकरे चार दिवसांपासून पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते देखील आजच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. अमित ठाकरे देखील आजच्या सोहळ्याला उपस्थित असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात वर्धापन दिन सोहळ्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनसेच्या वतीनं पुण्यात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फलक लावण्यात आले आहेत.
