MNS letter to CM : राज्य महिला आयोगाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांना; मनसेने पाठवलं पत्र
Maharashtra women commission : पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्य महिला आयोगाची तक्रार केलेली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य महिला आयोगाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मनसेकडून तक्रारीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे. राज्य महिला आयोगाचा बंद असलेला टोल फ्री क्रमांक सुरू करा, अशी मागणी या पत्रात केलेली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोग चांगलंच अडचणीत आलेलं आहे. आयोगावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहेत. म्हणून पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे आणि कारवाई तर दूरच पण निदान नंबर सुरु करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा फोन बंद असतो मग तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल देखील पत्रातून मनसेने उपस्थित केलेला आहे.
Published on: May 27, 2025 05:19 PM
