स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल, रोख नेमका कुणावर?
अकोटमध्ये भाजपने MIM सोबत युती केली आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. भाजप पक्ष फक्त सत्तेसाठी भुकेला आहे अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे. अकोटमधल्या युतीवरून भाजपला हिंदुत्व आणि मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही
महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ प्रकरणावरून काँग्रेसमधून काही लोकांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच लोकांना आता भाजपने पक्षात घेतलंय, त्याचबरोबर अकोटमध्ये भाजपने MIM सोबत युती केली आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. भाजप पक्ष फक्त सत्तेसाठी भुकेला आहे अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे. अकोटमधल्या युतीवरून भाजपला हिंदुत्व आणि मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही असा टोला अविनाश जाधव यांनी लगावला आहे. यासह त्यांनी मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलं असल्याचेही भाष्य केले.
स्वत: चा महापौर बसावायला मुल्ला-सुल्ला सगळे घेतलेले चालतात का? असा सवाल अविनाश जाधव यांनी भाजपला करत चांगलंच डिवचलंय. तर भाजप हा सत्तेसाठी भुकेला असलेला हा पक्ष आहे, असंही अविनाश जाधव म्हणाले. ‘जिधर बोजा, उधर सोजा’ असी भाजपची सध्यस्तिथी आहे. यावरून अविनाश जाधव यांनी मराठी माणसाला आव्हान केलंय, मराठी माणसासोबत रहा नाहीतर मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आहे.
