‘राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक मागितली, बोलायला लागलो तर..’, संदीप देशपांडेंचा भाजपच्या बड्या नेत्यावर घणाघात

‘राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक मागितली, बोलायला लागलो तर..’, संदीप देशपांडेंचा भाजपच्या बड्या नेत्यावर घणाघात

| Updated on: Mar 24, 2025 | 1:20 PM

एक खोक्याभाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केल्याचे पाहायला मिळालं होतं. यावरून भाजपच्या बड्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी पलटवार केलाय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचा झोलर असा उल्लेख केला आहे. निवडून येण्यासाठी आशिष शेलारांनी राज ठाकरेंकडे कितीवेळा भीक मागितली. मनसेने उमेदवार देऊ नये म्हणून झोलरांनी अनेकदा भीक मागितली. त्यामुळे आम्ही बोलायला लागलो तर मुंबईत फिरणं देखील अवघड होईल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तर आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर संदीप देशपांडेंनी हा पलटवार केला आहे. एक खोक्याभाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे, असं वक्तव्य मनसेच्या पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरून बोलताना आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘अस्तित्व जाणवून देण्यासाठी राज ठाकरेंनी वक्तव्य केलं. असं वक्तव्य करून आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं.. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. ज्यांनी काम केलं आहे, अशा लोकांना जनतेने निवडून दिलं आहे. मग तो कोणताही पक्षाचा असेल. ज्यांना लोकं निवडून देत नाहीत ते विधानपरिषदेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात’, असं शेलार यांनी म्हटलं होतं.

Published on: Mar 24, 2025 01:20 PM