MNS : ‘… हेच दहशतवादाला उत्तर असेल’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं काश्मीरला जाण्याचं पर्यटकांना आवाहन

MNS : ‘… हेच दहशतवादाला उत्तर असेल’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं काश्मीरला जाण्याचं पर्यटकांना आवाहन

| Updated on: Apr 24, 2025 | 1:58 PM

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यात 25 हून अधिकांचा जीव केला. दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटनासाठीचे बुकिंग रद्द होताना दिसताय. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. हेच लक्षात घेता मनसेने काश्मीरची सहल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

“ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतोय. जिथे हल्ला झाला किंवा जे काश्मीरचे पर्यटनाचे ठिकाणं आहेत, तिथे आम्ही जाणार आहोत. काश्मीर भारताच अविभाज्य अंग आहे, तिथे जायला आम्ही घाबरत नाही. तर पर्यटकांना आपल्याच भारतात फिरण्यासाठी कुठेही जाण्याची भिती नाही वाटली पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे” असं मनसे नेते मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, काश्मीर पर्यटनावर अवलंबून आहे, तेच बंद पाडण्याचा अतिरेक्यांचा, पाकिस्तानचा डाव आहे. तो हाणून पाडायचा असेल, तर देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केलं पाहिजे. हेच दहशतवादाला उत्तर आहे. कुठल्याही परिस्थितीत भारतातील सगळे नागरिक एकत्र येऊ शकतात हा संदेश गेला पाहिजे आणि त्याची सुरूवात आम्ही आमच्यापासून करतोय, असं मनसे देशपांडे म्हणाले.

Published on: Apr 24, 2025 01:58 PM