MNS : मनसे नेत्यानं नितेश राणेंची काढली औकात, ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चांची खिल्ली उडवली अन्..
सध्या राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहे. तर ठाकरे ब्रँड राहिला पाहिजे, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही ठाकरेंची युती होणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहे. अशातच जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल,अशी सकारात्मक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यावर दिली. तर ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चांची नितेश राणेंनी खिल्ली उडवली होती. ‘महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकाला २० आमदार दिले तर दुसऱ्याला शून्य आमदार दिले. आम्ही एवढे घाबरलो की आम्हाला झोप लागत नाहीये, एवढी भाजपला भिती वाटत आहे की आता आमचं कसं होणार?’, असं नितेश राणे म्हणाले. यानंतर प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. टीका करणाऱ्यांनी आपल्या औकातीत रहावं, असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. तर नितेश राणे यांनी शक्तीच्या बाहेर धोंडा उचलू नये, असा सल्लाही प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांना दिला.
