Nashik : ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर

Nashik : ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर

| Updated on: Jul 13, 2025 | 5:21 PM

MNS Thackeray News :

शैलेश पुरोहित, प्रतिनिधी. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) इगतपुरी येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय शिबिराला उद्या, 14 जुलै 2025 पासून सुरुवात होणार आहे. हे शिबिर इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये होणार असून, यासाठी 70 हून अधिक खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. शिबिराच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

हे शिबिर मनसेच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यावेळी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वी महाबळेश्वर येथे अशाच प्रकारचे शिबिर घेतले होते, ज्यानंतर त्यांनी शिवसेना सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यामुळे इगतपुरीतील या शिबिरात राज ठाकरे काय बोलणार आणि कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 13, 2025 05:21 PM