Raj Thackeray : EVM नं मतं चोरीचा आरोप… किती चाटूगिरी, शिंदेंवरही राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray : EVM नं मतं चोरीचा आरोप… किती चाटूगिरी, शिंदेंवरही राज ठाकरेंची टीका

| Updated on: Oct 30, 2025 | 10:01 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमद्वारे मतांची चोरी होत असल्याचा आरोप करत सरकारवर मॅच फिक्सिंगचा ठपका ठेवला. त्यांनी मतदार याद्या स्वच्छ करण्याची मागणी केली. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर नमो टुरिझम सेंटरच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करत गडकिल्ल्यांवर अशी केंद्रे उभारल्यास ती फोडून टाकण्याचा इशारा दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ईव्हीएम आणि बोगस मतदानामुळे मतांची चोरी होत असून, निवडणुका मॅच फिक्स असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी असूनही मतांमध्ये त्याचे रूपांतर होत नाही, याचे कारण गेली १०-१२ वर्षे सुरू असलेला हा भानगडीचा प्रकार आहे. त्यांनी निवडणुका घेण्यापूर्वी मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ करण्याची मागणी केली, जरी त्यासाठी एक वर्ष अधिक लागला तरी चालेल असे ते म्हणाले.

याव्यतिरिक्त, राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडकिल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याच्या पर्यटन खात्याच्या योजनेवर त्यांनी सडकून टीका केली. शिवनेरी, रायगड, राजगडासारख्या ऐतिहासिक स्थळांवर असे नमो केंद्र उभारल्यास ते फोडून काढण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. मुंबईत १ तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चालाही त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Published on: Oct 30, 2025 10:01 PM