MNS : मतदारांच्या यादीवरून राहुल गांधींनंतर राज ठाकरे आक्रमक, आयोगाकडे मनसेची मागणी काय?

MNS : मतदारांच्या यादीवरून राहुल गांधींनंतर राज ठाकरे आक्रमक, आयोगाकडे मनसेची मागणी काय?

| Updated on: Aug 13, 2025 | 10:40 AM

मतांच्या चोरीवरून राहुल गांधी यांनी आरोप केला. अशातच इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि आता मनसे मतांच्या याद्यांवरून आक्रमक बनली आहे. मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ज्यामध्ये पुनर्परीक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

राहुल गांधींनी बनावट मतांचा विषय हाती घेतला असतानाच महाराष्ट्रात याच मुद्द्यावरून मनसेने राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकी आधी मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षणाची मागणी मनसेने केली आहे. मतदार याद्यांमधील डबल नावं आणि चुकीच्या पट्ट्यांसह बनावट नावं हटवा. तसेच महापालिकांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅटची मागणी मनसेने केली आहे. कारण महापालिकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट अर्थात मतदान केल्यानंतर मतदानाची जी चिठ्ठी दिसते ते यावेळी दिसणार नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरणार नाही. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे. लोकांही धोक्यात आल्याचं लोकांना वाटत आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्ही जिंकणार असे दावे सत्ताधारी करतायत. मग मतपत्रिकेवर मतदान घ्या असं आव्हान नांदगावकरांनी केलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 13, 2025 10:40 AM