मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे ‘वर्षा’वर, मनसे युतीत सहभागी होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले आहेत. पाहा व्हीडिओ...
विनायक डावरुंग, प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पोहोचले आहेत. राज ठाकरे काहीवेळा पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचलेत. अंधेरी पोटनिवडणुकीआधी ही भेट महत्वपूर्ण आहे. अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. अशात राज ठाकरे आणि शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीला विशेष महत्व आहे. मनसे युतीत सहभागी होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Published on: Oct 15, 2022 03:35 PM
