Sandeep Deshpande : MNS मविआचा भाग नाही, पवार-ठाकरे काय बोलतात..देणं घेणं नाही.. मनसे नेत्यानं क्लिअरच केलं

Sandeep Deshpande : MNS मविआचा भाग नाही, पवार-ठाकरे काय बोलतात..देणं घेणं नाही.. मनसे नेत्यानं क्लिअरच केलं

| Updated on: Nov 21, 2025 | 3:38 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी युती-आघाडीच्या चर्चांना जोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ठाकरे बंधूंना (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आणण्यासाठी सकारात्मक असल्याचे कळते. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवल्या जाव्यात, असे शरद पवारांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती, ज्यात युतीसंदर्भात चर्चा झाली. मतदार यादीतील घोळासारख्या मुद्द्यांवर सर्व पक्ष एकत्र येत मोर्चे काढतात, तर निवडणुका स्वतंत्रपणे का लढतात, असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केल्याचे समजते. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याबाबतही पवार सकारात्मक असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महाविकास आघाडीत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडताना म्हटले की, “उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काय बोलतात, याच्याशी मनसेला काहीही देणंघेणं नाही.” संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि तो महाविकास आघाडीचा भाग नाही. पक्षाचे सर्व निर्णय सन्माननीय राज ठाकरे घेत असतात, असेही त्यांनी सांगितले.

Published on: Nov 21, 2025 03:38 PM