MNS : मोर्चासाठी मनसेचा लोकलमधून प्रचार, संदीप देशपांडेंनी ट्रेनमध्ये पत्रकं वाटून दिलं मुंबईकरांना निमंत्रण

MNS : मोर्चासाठी मनसेचा लोकलमधून प्रचार, संदीप देशपांडेंनी ट्रेनमध्ये पत्रकं वाटून दिलं मुंबईकरांना निमंत्रण

| Updated on: Jun 28, 2025 | 3:13 PM

मनसे आणि ठाकरेंची सेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर मोर्चाच्या नियोजनची जबाबदारी देण्यात आली असून या मोर्चाची वेळ आणि मोर्चाचा मार्ग एकत्रितरित्या ठरवण्यात येणार आहे. बघा कोणत्या नेत्यावर जबाबदारी सोपावली?

येत्या पाच जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाचा मनसेकडून आता लोकल ट्रेनमध्ये प्रचार सुरू करण्यात आला आहे. मनसेच्या संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांनी येत्या पाच जुलैच्या मोर्चासाठी लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. यावेळी मनसेकडून मुंबईकरांना या मोर्चासंदर्भात पत्रकं वाटण्यात येत आहे. हिंदीच्या मुद्यावर 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा एकत्रित मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून मोर्चाची तयारी देखील सुरू झाली आहे. याच मोर्चाच सहभागी होण्यासाठी सामान्य मुंबईकरांना हाक देण्यात येत आहे. मराठीसाठी लोकल ट्रेनमध्ये जाऊन संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या एकत्रित मोर्चाच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळतंय.

Published on: Jun 28, 2025 03:13 PM