Sandeep Deshpande | ‘खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही’-

| Updated on: May 04, 2022 | 8:38 PM

मी कोठेही पळालेलो नाही. तसेच खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही असे सांगितले आहे.

Follow us on

मुंबई : दिवसेंदिवस मनसे (MNS) नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांना (Mumbai Police) चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे. या प्रकरणी पोलीस आता एक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे संदीप देशपांडेंचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात सध्या यावरून जोरदार घमासान सुरू आहे. राज ठाकरे हे मशीदीवरील भोंगे उतरवण्यावर ठाम राहिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राज्यभर हनुमान चालीसा लावत रान पेटवलं आहे. पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावण्याचे प्रयत्न मनसे कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अनेकजण पोलिसांच्या ताब्यातही आहे. सकाळी पोलीस हे मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपण कोठेही पळून गेलेलो नसल्याचे सांगत ‘खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही’ असे म्हटले आहे.