MNS Thane : मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्… नेमकं घडलं काय?
मनसेने ठाण्यातील मुंब्रा येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी कर्मचारी नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मोठा गोंधळ घातला. मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामात दिरंगाई आणि पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसणे, या मुद्द्यांवरून मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडून आपला निषेध व्यक्त केला. अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आणि समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने मनसे अधिक आक्रमक झाली. यावेळी, संतप्त कार्यकर्त्यांनी लोकशाहीला काडी लावली आहे का?, असे प्रश्न विचारत प्रशासकीय व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदार यादी अद्ययावत करणे हे लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, यात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे मनसेने म्हटले आहे.
Published on: Dec 15, 2025 04:36 PM
